नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात

By Admin | Updated: August 20, 2014 00:44 IST2014-08-20T00:15:04+5:302014-08-20T00:44:45+5:30

समाधान : वाहतूक कोंडी फुटणार

Start of widening of Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात

नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात

उपनगर : नाशिक-पुणे महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र मागे घडले त्याप्रमाणे काम सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने गेल्या काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचा विषय चर्चिला जात आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस पूर्वी रस्ता खरडून रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र लागलीच ते कामदेखील बंद पडले होते. कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपला असून, सध्या पावसानेदेखील विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात
आहे. सदर रस्ता रुंदीकरणाला मंजुरी मिळाली असून, जागा ताब्यात घेण्याची कारवाईदेखील झालेली आहे. दुकानांच्या संरक्षक भिंती मागे घेण्यात आलेल्या आहेत. तसेच जी झाडे रुंदीकरणात अडथळा ठरत आहेत, त्यावर मार्किंगदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी सदर रस्त्याचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Start of widening of Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.