मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याच्या कामांना प्रारंभ

By Admin | Updated: June 1, 2014 00:46 IST2014-05-31T21:43:05+5:302014-06-01T00:46:22+5:30

येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मांजरपाडा प्रकल्पअंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या पूर्णत्वासाठी ७० कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे निधीअभावी बंद असलेली बोगद्याची कामे सुरू होतील. तसेच वर्षअखेर ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Start of tunnel work of Manjrapada project | मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याच्या कामांना प्रारंभ

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याच्या कामांना प्रारंभ

येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मांजरपाडा प्रकल्पअंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या पूर्णत्वासाठी ७० कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे निधीअभावी बंद असलेली बोगद्याची कामे सुरू होतील. तसेच वर्षअखेर ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
निधी उपलब्धतेमुळे ८.८६ कि.मी. पैकी १२६0 मी. बोगद्याचे काम पूर्ण होते शक्य होणार आहे, तसेच पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधीत विभागास ना. भुजबळांनी आदेश दिले.
सुरगाणा तालुक्यातील केम पर्वताच्या पायथ्याशी पार नदीवर २६२ मीटर लांबीचा ३८ मीटर उंच स्पिल वे चे काम प्रगतिपथावर आहे. १३ वळण बंधारे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या वळण बंधार्‍यामुळे अडवलेले ६0६ द.ल.घ.फू. पाणी ८.९६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात टाकून या कालव्याद्वारे दरसवाडी प्रकल्पातून डोंगरगाव मध्य प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेतून ९० कि.मी. लांबीच्या पोहोच कालव्याद्वारे चांदवड तालुक्यातील ५ व येवला तालुक्यातील ३५ पाझरतलाव व २ लघुपाटबंधारे तलाव पाण्याने भरून देण्याचे या योजनेचे प्रयोजन आहे. या योजनेमुळे मतदारसंघातील उत्तर-पूर्व परिसरातील सर्व गाव सिंचनाखाली येणार असून, शेतीबरोबरच, पिण्याचाही प्रश्न निकाली निघणार आहे.
येथील संपर्क कार्यालयात कामाचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ॲड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, नगरसेवक मनोहर जावळे, हुसेन शेख, राधाकिसन सोनवणे, पंकज पारख आदिंनी विविध प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. सायगाव, महालखेडा भागातील रेंगाळलेल्या कामासंबंधाने ग्रामस्थांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. उत्तर पूर्व भागाचे साकरचंद साळवे यांनी या भागातील न झालेल्या कामांची यादी वाचली.
अहल्याबाई होळकर जयंती
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंगणगाव येथील अहल्याबाई घाटावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ. सुधीर जाधव, ॲड. माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, साकरचंद साळवे, अरुण थोरात, वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालिकेचे गार्‍हाणे घातले
पालिकेत सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान कर्मचारी यांचेत चालू असलेली सुंदोपसुदी व त्यातून कामबंद आंदोलन या संदर्भाने नगरसेवक मनोहर जावळे यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Start of tunnel work of Manjrapada project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.