शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:51 IST

नाशिक  : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देखिल म्युकरमायकोसिस रुग्ण आढळुन येत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करावा तसेच रूग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या वाढवून दयावी अशा सूचना विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्ह्यासाठी बोलविलेल्या आरोग्य विभाग विशेष बैठकीत केल्या.

ठळक मुद्दे नरहरी झिरवाळ यांची सूचना म्युकरमायकोसीसबाबत घेतला आढावा 

नाशिक  : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देखिल म्युकरमायकोसिस रुग्ण आढळुन येत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करावा तसेच रूग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या वाढवून दयावी अशा सूचना विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्ह्यासाठी बोलविलेल्या आरोग्य विभाग विशेष बैठकीत केल्या.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत चालल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. त्यातच कोरोनामुळे रूग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे सद्यस्थितीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी म्युकर मायकोसिस आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही त्यासाठी खूप आर्थिक खर्च लागतो. म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त प्रत्येक रुग्णास दररोज चार ते पाच इंजेक्शन लागते. जिल्ह्यातील रुग्ण संख्या लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याची एकूण रोज गरज एक हजार ते बाराशे इंजेक्शन गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात २०० ते २५० इंजेक्शन उपलब्ध होतात त्यामुळे इंजेक्शन पुरवठा वाढवावा. तसेच म्युकर मायकोसिस साथरोग रुग्णास येणारा खर्च किमान सात लाख रुपये असून म्युकरमायकोसिस साथरोग आजारावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करणे गरजेचे आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर शस्त्रक्रिया होत नसल्याने रूग्णांची गैरसोय होते. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग सुरु करावा. डेडिकेटेड म्युकरमायकोसिस साथरोग हॉस्पिटल घोषित करणे यावर चर्चा करण्यात येऊन रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा वेळीच उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सुचना झिरवाळ यांनी बैठकीत केली.

या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, महापालिका आयुक्त कैलास जाधव, सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारHealthआरोग्यNCPराष्ट्रवादी काँग्रेस