गाळेधारकांच्या उपोषणाला प्रारंभ
By Admin | Updated: April 29, 2017 01:12 IST2017-04-29T01:12:06+5:302017-04-29T01:12:48+5:30
रस्ता गाळ्याचे बांधकाम करून बंद केल्याप्रकरणी गाळेधारकांनी हा रस्ता पुन्हा चालू करावा या मागणीसाठी गाळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.

गाळेधारकांच्या उपोषणाला प्रारंभ
घोटी : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यातील गाळेधारकांना जाण्यासाठी असलेला रस्ता गाळ्याचे बांधकाम करून बंद केल्याप्रकरणी त्रस्त झालेल्या गाळेधारकांनी हा रस्ता पुन्हा चालू करावा या मागणीसाठी अतिक्रमित गाळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान हे उपोषण मागे घ्यावे यासाठी अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
घोटी बाजार समितीने बाजार समिती आवारात व्यापारी गाळे बांधले आहेत. यात बाजार समिती आवारात जाण्यासाठी तसेच या आवारातील गाळेधारकासाठी रस्ता ठेवण्यात आला होता. मात्र सदर गाळ्याची बाजार समितीने परस्पर विक्री केल्याने या रस्त्यावर बाळू बहिरू वाजे या गाळेधारकांनी गाळ्याचे बांधकाम करून हा रस्ता बंद केला आहे. दरम्यान हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी बाजार समितीकडे सातत्याने करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर या त्रस्त गाळेधारकांनी बंद केलेल्या रस्त्यांवर उपोषण सुरू केले आहे. सहकार निबंधक, पोलीस प्रशासन यांनी दखल न घेतल्याने बुधवारी गाळेधारक बाळू रामजी चांदे, दीपक आत्माराम कोरडे, मिस्जद सांडू पिंजारी, सुरेश बाळू कोरडे, यांनी हॉटेल प्रभात शेजारी या बेकायदेशीर गाळ्यासमोरच आमरण उपोषणाला सुरु वात केली आहे. यावेळी अरु ण जगताप, शांताराम क्षीरसागर, विनोद राठोड, प्रवीण परदेशी, कैलास सूर्यवंशी या गाळेधारकांनीही ठिय्या सुरू केला आहे.
प्रशासनाने व बाजार समिती संचालक मंडळाने उतपोषणार्थीची दखल घेऊन न्याय द्यावा. अन्यथा हे आंदोलन व्यापक स्वरूपात केले जाईल, असा इशारा उपोषणार्थींनी दिला. ( वार्ताहर)