शिवपुराण ज्ञानयज्ञाचा प्रारंभ

By Admin | Updated: November 26, 2015 21:36 IST2015-11-26T21:35:21+5:302015-11-26T21:36:13+5:30

घोटी : रास गरबा, आदिवासी नृत्य ठरले मिरवणुकीचे आकर्षण

The start of Shiva Purana Jnanavyam | शिवपुराण ज्ञानयज्ञाचा प्रारंभ

शिवपुराण ज्ञानयज्ञाचा प्रारंभ

घोटी : येथील प्रसिद्ध व्यापारी पटेल यांच्या वतीने आयोजित श्री शिवपुराण ज्ञानयज्ञाला आज घोटी शहरात दिमाखात सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर घोटी शहरात गुरुवारी (दि. २६) गिरी बापू यांच्यासह उपस्थित संत-महात्मा यांच्या काढण्यात आलेल्या शाही मिरवणुकीने घोटीकरांचे डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. या शाही मिरवणुकीत उंट, घोडा, घोड्याचे रथ यांच्यासह गरबा, आदिवासी कामडा नृत्य, नाचणारा घोडा आदिंनी उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीत इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विख्यात शिवमहापुराण विश्लेषक गिरी बापू यांच्या सुश्राव्य शिवमहापुराण ज्ञानयज्ञाचे घोटी येथील प्रसिद्ध व्यापारी रामजीभाई प्रेमजीभाई पटेल आणि भरतभाई रामजी पटेल यांनी आयोजन केले आहे.
सलग सप्ताहभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्र मात दुपारी २ ते ५ या वेळात कथा विश्लेषण होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया रास, भजन आदि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
गुरुवारी या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजता गिरी बापू यांचे घोटी शहरात आगमन झाल्यावर कपिलधारा तीर्थाचे रामनारायणदास फलहारी महाराज आदिंसह उपस्थित संत-महात्म्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची लक्ष्मी सॉ मिल येथे सांगता झाल्यावर या शिवमहापुराण कथायज्ञाला आरंभ झाला.
आजच्या पहिल्या दिवशी गिरी बापू यांनी शिवमहात्म आपल्या संगीत वाणीने विशद केले. (वार्ताहर)



 

Web Title: The start of Shiva Purana Jnanavyam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.