वणीत बुधवारी टमाटा लिलाव विक्रीला प्रारंभ
By Admin | Updated: September 22, 2015 22:35 IST2015-09-22T22:34:03+5:302015-09-22T22:35:20+5:30
वणीत बुधवारी टमाटा लिलाव विक्रीला प्रारंभ

वणीत बुधवारी टमाटा लिलाव विक्रीला प्रारंभ
वणी : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वणी उपबाजार आवारात बुधवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता टमाटा लिलाव विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबई कृषी उत्पन बाजार समिती संचालक दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत विक्रीस प्रारंभ होणार आहे. देशांतर्गत व परदेशात वणी उपबाजाराशी टमाटा खरेदी-विक्र ीची प्रक्रिया संलग्न असून, येथून हजारो क्विंटलची प्रतिदिन उलाढाल होते. पारदर्शी व्यवहार तसेच विक्रेत्यांना रोख स्वरूपात पैसे देण्यात समितीचा अग्रक्र म असल्याने हंगामाच्या उत्तरार्धापर्यत येथे मोठी आवक होते, अशी माहिती निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. लिलाव शुभारंभाप्रसंगी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले आहे.(वार्ताहर)