साईचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

By Admin | Updated: April 6, 2016 23:11 IST2016-04-06T23:09:52+5:302016-04-06T23:11:27+5:30

सुरेगाव रास्ता : हरिपाठासह सामूहिक आरती

Start of Sai Sritra Parayan Sohal | साईचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

साईचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

 येवला : भगवंत आपल्याला कधीही विसरत नसतो, मात्र आपणच भगवंताला विसरतो. त्यामुळे भगवंताची नेहमी उपासना करा, व्यावहारिक भक्ती करू नका, असे आवाहन आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केले. सुरेगाव रास्ता येथे साईचरित्र पारायण सोहळ्याला दिमाखात सुरु वात झाली असून, या सोहळ्याअंतर्गत आयोजित प्रवचनाप्रसंगी हभप आमदार चिकटगावकर बोलत होते.
प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी चिकटगावकर यांच्या हस्ते हरिपाठ व सामुदायिक सार्इंची आरती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे, जगन्नाथ ढमाले, वाल्मीक मगर, भजन मंडळाच्या वतीने दिगंबर साबळे, कचरू चव्हाण, यांच्या हस्ते चिकटगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवचनात बोलताना ते म्हणाले, रामकृष्णहरी हा मंत्र भगवंताने मानवी जीवनाच्या उद्धारासाठी दिलेला आहे. राम म्हणजे नीतीचे प्रतीक, कृष्ण प्रीतीचे प्रतीक, तर हरी म्हणजे शांतीचे प्रतीक असल्याचे सांगत रामायण, गीता, भागवत या ग्रंथांमुळे ऊर्जा व शक्ती मिळते. रामायण हे आपणाला कसे वागायचे, तर गीताद्वारे कसे जगायचे, भागवतमुळे कशी मुक्ती मिळते याचे उदाहरणदेखील उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. भारतात धर्माला खूप महत्त्व आहे. साईबाबांकडे बघितलं तर कुठली जात व धर्म आहे हे कळत नाही. श्री साईबाबांनी सर्वधर्मसमभाव व मानवतेच्या धर्माचा आदर्श घालून दिला. हे जगातले एकमेव उदाहरण आहे. धर्मशक्ती जमविण्याकरिता संत लागतात. त्यामुळे संतांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही आमदार चिकटगावकर यावेळी म्हणाले. जोपर्यंत धर्म नाही, तोपर्यंत कर्म नाही असे सांगताना ते म्हणाले, धर्माच्या वाटेने जाल तर हित आहे. त्यामुळे संतांच्या सान्निध्यात राहा, देवावर भक्ती करा, असा सल्ला यांनी उपस्थितांना दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येवर बोलताना ते म्हणाले शरीर अनमोल आहे. सुखाचे जसे सोबती आहेत तसे दु:खाचाही सामना करा. प्रस्ताविक बाबा डमाळे यांनी केले. गुरुवारी (दि. ७) सरला बेट मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता होईल.
यावेळी हरिसंपत सोमासे, विठ्ठल चव्हाण, शरद पवार, संजय आसने, साहेबराव भागवत, कृष्णा अहेर, विमल चव्हाण, मनीषा वेताळ, कांता भोसले, ईश्वर सोमासे, विजय ढमाले, आबा सोमासे आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Start of Sai Sritra Parayan Sohal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.