‘नमामि गोदा’च्या जनप्रबोधन वारीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:19 IST2017-08-20T23:51:22+5:302017-08-21T00:19:12+5:30
गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला.

‘नमामि गोदा’च्या जनप्रबोधन वारीला प्रारंभ
नाशिक : गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, याअंतर्गत ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदाजलचे कलश घेऊन गोदा प्रदूषणमुक्तीच्या जनजागृतीपर वारीला रविवारी ब्रह्मगिरी पर्वतापासून (दि.२०) प्रारंभ करण्यात आला. त्र्यंबकेश्वरमधून उगम पावणाºया गोदावरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनातर्फे फ ारसे प्रयत्न होत नाही. त्यामुळे जनप्रबोधनासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ स्थापन केले गेले आहे. सकाळी भर पावसात त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत अभिनेता चिन्मय उद््गीरकर, धनश्री क्षीरसागर, पूर्वा सावजी यांनी सर करत गोदेच्या उगमस्थानावरून गोदाजलाचे कलश भरून खाली आणले. तेथून कुशावर्तावर येऊन गोदा जल आणि गोदावरीच्या मूर्तीची विधीवत पूजन करण्यात आले. येथे वारीचे स्वागत शासनाच्या वतीने तहसीलदार महेंद्र पवार यांनी शासनाच्या वतीने केले.
‘नमामि’चे अध्यक्ष गोदाप्रेमी राजेश पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघालेली वारी चक्रतीर्थ येथे पोहचली. तेथे गावकºयांनी स्वागत केले. तसेच स्वामी सोमेश्वरानंद यांच्या आश्रमात वारी पोहचली. येथे स्वामींनी वारीचे स्वागत केले. महिरावणी येथे वारी दाखल झाल्यानंतर तेथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावकºयांनी स्वागत केले. गोदाजल कलशाचे पूजन सुवासिनींकडून करण्यात आले. महिरावणीच्या ग्रामस्थांनीही गोदा प्रदूषणमुक्तीसाठी वचन ‘नमामि’ सोबत घेतले. अॅड शिरिष दंदणे, रोहन देशपांडे, किरण भालेराव आदिंसह सदस्य, स्वयंसेवक सहभागी झाले होते.
‘सोमेश्वर’ होणार प्लॅस्टिकमुक्त
गोदा प्रदूषणासाठी सोमेश्वर मंदिर विश्वस्त मंडळानेही ‘नमामि गोदा फाउंडेशन’च्या गोदा सन्मान अभियानात सहभागी होत सोमेश्वर मंदिर परिसर पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला. भाविक, विक्रेत्यांना कॅरिबॅगचा वापर मंदिराच्या आवारात क रू दिला जाणार नसल्याचे आश्वासन विश्वस्तांनी ‘नमामि फाउंडेशन’ला दिले. जनप्रबोधन वारी मंदिरात मुक्कामी होती. सोमवारी (दि.२१) सकाळी वारी रामकुंडाच्या दिशेने मार्गस्थ होईल.