शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

म्हसोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:20 IST

श्री म्हसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

नाशिकरोड : श्री म्हसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये देवळालीगावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळी दर्शनासाठी व यात्रेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर फुलून गेला होता.  देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त बुधवारी पहाटे राहुल बुवा, कोमल बुवा, प्रकाश चव्हाण, प्रियंका चव्हाण, दीपक मालुंजकर यांच्या हस्ते अभिषेक तर हेमंत गोसावी व कविता गोसावी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर आठवडे बाजारातून वाजत-गाजत मांडव डहाळे मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती.हभप त्रंबकबाबा भगत, अण्णा गुरूजी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, पंच कमिटीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, ज्योती खोले, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, शाम खोले, सुधाकर जाधव, शंकर साडे, शांताराम घंटे, चंदू साडे, गिरीश मुदलियार आदी सहभागी झाले होते. पंच कमिटीच्या वतीने काश्मीर- मधील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून यात्रेत फेटे व गुलाल यांना फाटा देण्यात आला होता. यावेळी सूर्यभान घाडगे, बाळनाथ सरोदे, रूंजा पाटोळे, कैलास चव्हाण, राजेंद्र गायकवाड, पुंडलिक खोले, प्रदीप देशमुख, सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. दुपारी परिसरातील भाविकांनी नैवेद्य दाखविण्यासाठी गर्दी केली होती.सायंकाळी प्रथेप्रमाणे श्री म्हसोबा महाराज प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी व जत्रेत खरेदीसाठी भाविक, महिलांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. सायंकाळी गांधी पुतळा येथे उभारण्यात आलेल्या मंचावर ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.यात्रेमुळे बिटकोकडून विहितगावकडे जाणारी वाहतूक व विहितगावकडून येणारी वाहतूक सत्कार पॉइंट, सुभाषरोड, मालधक्का रोड, राजवाडा मार्गे वळविण्यात आली होती. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, नाशिकरोडचे नीलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आज कुस्त्यांची दंगलश्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त देवळालीगाव कुस्ती स्टेडियममध्ये गुरुवारी (दि़ १४) दुपारी ३ वाजेपासून कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवळालीगाव पंच कमिटीने केले आहे.यात्रोत्सवानिमित्त आठवडे बाजारातून वाजत-गाजत मांडव डहाळे मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली होती.  पंच कमिटीच्या वतीने काश्मीरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून यात्रेत फेटे व गुलाल यांना फाटा देण्यात आला होता.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक