मालेगावी श्यामबाबा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:39 IST2020-03-06T23:38:38+5:302020-03-06T23:39:02+5:30

श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला.

The start of the Malegavi Shyamoba Festival | मालेगावी श्यामबाबा महोत्सवास प्रारंभ

मालेगावच्या श्याम भक्त मंडळातर्फे श्यामबाबा खाटूवाले यांच्या महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी भाविक.

मालेगाव : श्याम भक्त मंडळातर्फे कॅम्पातील स्मशान मारुती येथील श्याम मंदिरात श्यामबाबा खाटूवाले यांच्या २५ व्या वार्षिक महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राणी सती मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. अग्रसेन भवनापासून निघालेल्या शोभायात्रा कॅम्परोड मार्गे श्यामबाबा मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी ध्वजयात्रा, आरती, महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम झाले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राजस्थानी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम झाला.
शोभायात्रेत ओमप्रकाश सारडा, रमेश शर्मा, महेंद्रकुमार मोदी, अशोक राणासार, अशोक सराफ, सतीश अग्रवाल, सरिया बाहेती, वंदना जाजू, सुलोचना अग्रवाल, शांती वर्मा, रेशमा बाहेती, मोहिनी पारीख आदि सहभागी झाले. शनिवारी दुपारी छपन्नभोग व महाआरतीचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी आनंदमेळा होणार आहे.

Web Title: The start of the Malegavi Shyamoba Festival