मालेगाव महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: January 20, 2017 00:38 IST2017-01-20T00:37:46+5:302017-01-20T00:38:06+5:30
रन मालेगाव रन : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मालेगाव महोत्सवास प्रारंभ
मालेगाव : मालेगाव महोत्सव २०१७ ची शानदार सुरुवात ‘रन मालेगाव
रन’ने करण्यात आली. आज सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी
महाराज पुतळ्याजवळ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रन
मालेगाव रनला झेंडा दाखवून शुभारंभ केला.
मालेगाव महोत्सवनिमित्त
शहरात १९ ते २४ जानेवारीदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आज रन मालेगाव रन, कबड्डी, फुटबॉल, बास्केट बॉल स्पर्धा व सायंकाळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा आनंद शहर व तालुकावासीयांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
रन मालेगाव रनच्या शुभारंभासाठी डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. विनित देवरे, डॉ. रवींद्र हिरे, भिकू खैरनार, जोशी, नितीन खैरनार, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, नारायण शिंदे, राजाराम जाधव, मच्छिंद्र अहिरे, सुरेश गवळी, तानाजी देशमुख, उत्तम कचवे, कैलास येशीकर, प्रवीण इनामदार, देवा माळी, शशी निकम, अविनाश निकम, जयवंत महाजन, विलास बिरारी, गोविंद गवळी, विजय गवळी, ज्योती भोसले, जिजाताई बच्छाव, संगीता चव्हाण, गणेश पाटील, पिंकी पाटील, बॉबी पाटील, छोटू काकळीज, अभिजित पगार, भाग्येश कासार, जे.पी. बच्छाव, सोमा पहिलवान, जगदीश गोऱ्हे, विनोद वाघ, दादा बहिरम, राजेश गंगावणे, यशपाल बागुल, भरत पाटील, नाना बच्छाव, तालुक्यातील शालेय विद्यार्थी, क्रीडाशिक्षक, नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)