मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

By Admin | Updated: August 4, 2014 00:51 IST2014-08-03T20:45:40+5:302014-08-04T00:51:55+5:30

मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

Start of Malegaevere Panchayat Samiti fair | मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

मालेगाव कॅम्प : येथील पंचायत समितीतर्फे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पंचायत सबलीकरण मेळावा व नेतृत्व विकास शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे.
दिनांक ३० जुलै ते ७ आॅगस्ट दरम्यान हे अभियान तालुक्यातील प्रमुख मंडळनिहाय गावांमध्ये राबविले जाणार आहे. गेल्या मार्च महिन्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. त्यात पंचायतराज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यंत्रणा, पदाधिकारी सदस्यांचे सक्षमीकरण करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, माहिती शिक्षण संप्रेषण कार्यक्रमाद्वारे पंचायतराज अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद प्रभाग पातळीवर नेतृत्व विकास शिबिर उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये नाव नोंदणी व प्रस्तावना, अभियानाची ओळख, आपल्या तालुक्याची सद्यस्थिती, ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण, महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी क्रांतिज्योती प्रशिक्षण, गटनिहाय विविध विषयांवर चर्चा आदि विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. बुधवारी चंदनपुुरी येथून या अभियानास सुरुवात झाली. येत्या रविवारी ४ आॅगस्टला मालेगाव पंचायत समिती सभागृहात पंचायत सबलीकरण मेळावा आहे . तसेच येत्या ७ आॅगस्टला वडनेर येथे या अभियानाचा समारोप होईल.
या अभियानांतर्गत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी यशवंत पंचायतराज अभियानातील सर्व माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियान व मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती सभापती वंदना पवार, गटविकास अधिकारी एस. बी. अजवेलकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Start of Malegaevere Panchayat Samiti fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.