रावणाची प्रतिकृती बनविण्यास प्रारंभ
By Admin | Updated: October 20, 2015 22:00 IST2015-10-20T21:59:12+5:302015-10-20T22:00:43+5:30
रावणाची प्रतिकृती बनविण्यास प्रारंभ

रावणाची प्रतिकृती बनविण्यास प्रारंभ
उपनगर : गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब मैदानावर दसऱ्याला होणाऱ्या रावण दहनासाठी ५१ फूट रावणाची प्रतिकृती बनविण्याची तयारी सुरू झाली आहे.
गांधीनगर येथे नवरात्रोत्सव काळात सादर केल्या जाणाऱ्या रामलीला नाटिकेची सांगता ही रावण दहनाच्या कार्यक्रमाने होत असते. यंदा रामलीला उत्सव समितीतर्फे दसऱ्याला रावण दहनासाठी ५१ फुटी उंचीची प्रतिकृती बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रावणाची प्रतिकृती बनविण्यासाठी अशोक सोनवणे, विमला सोनवणे या बांबू कारागिरांसोबत रामलीला समितीचे तस्लीम पठाण, सुनील मोदियानी, सुमीत पवार, विशाल खाटावकर, दीपक शर्मा आदि तयारीला लागले
आहेत. (वार्ताहर)तयारी रावण दहनाची : गांधीनगर येथे दसऱ्याला रावण दहनासाठी ५१ फुटी रावणाची प्रतिकृती बनविण्याच्या तयारीला लागलेले कारागीर.