उमराणे बाजार समितीत मका विक्र ीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST2017-09-26T23:19:26+5:302017-09-27T00:30:03+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार मार्केट आवारात चालू हंगामातील नवीन मका माल विक्रीस आल्याने बाजार समिती व भुसार व्यापारी यांच्यातर्फे खरेदी -विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

Start of maize vendor in Umraane Bazar Samiti | उमराणे बाजार समितीत मका विक्र ीस प्रारंभ

उमराणे बाजार समितीत मका विक्र ीस प्रारंभ

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार मार्केट आवारात चालू हंगामातील नवीन मका माल विक्रीस आल्याने बाजार समिती व भुसार व्यापारी यांच्यातर्फे खरेदी -विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.  मका मालास १२४१ रु पये भाव मिळाला. दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याप्रमाणेच हंगामातील प्रथम विक्रीस आलेल्या भुसार मालाचाही शुभारंभ करण्यात येतो. त्या अनुषंगाने चालूवर्षी सांगवी (ता. देवळा) येथील सुभाष परसराम देवरे या शेतकºयाने नवीन मका माल विक्रीस आणला होता.  बाजार समितीच्या रिवाजाप्रमाणे मका मालाचे पूजन समितीचे सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले व शेतकरी सुभाष देवरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्नेहा भुसार व्यापारी नीलेश पारख यांनी सर्वोच्च १२४१ रुपयांची बोली लावत मका खरेदी केला.

Web Title: Start of maize vendor in Umraane Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.