निवेकच्या जागेवर कोविड सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST2021-04-22T04:15:06+5:302021-04-22T04:15:06+5:30

सातपूर : कोरोना रुग्णांसाठी शहरात कोविड सेंटरची नितांत गरज असून, सातपूर औद्योगिक वसाहतीतील निवेक क्लब येथे सुसज्ज कोविड सेंटर ...

Start Kovid Center at Nivek's place | निवेकच्या जागेवर कोविड सेंटर सुरू करा

निवेकच्या जागेवर कोविड सेंटर सुरू करा

सातपूर : कोरोना रुग्णांसाठी शहरात कोविड सेंटरची नितांत गरज असून, सातपूर औद्योगिक वसाहतीतील निवेक क्लब येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव निवेदनाद्वारे उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठी व रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यंत सुयोग्य जागा निवेक क्लब असून, हा प्लॉट महामंडळाच्या मालकीचा आहे व त्यावर केलेले बांधकाम हे पूर्णतः महामंडळाने स्वखर्चाने केलेले आहे. मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने शासनाने फाईव्ह स्टार व सेव्हन स्टार हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच न्यायाने निवेक क्लबची शासकीय मालकीची जागा ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरु करता येईल. व्यापक जनहिताचा विचार करुन एमआयडीसी मुख्यालयाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना त्वरित सादर करावा, अशी मागणी उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Start Kovid Center at Nivek's place