काकाणीत शारदोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: October 13, 2015 22:42 IST2015-10-13T22:41:27+5:302015-10-13T22:42:32+5:30
काकाणीत शारदोत्सवास प्रारंभ

काकाणीत शारदोत्सवास प्रारंभ
मालेगाव : येथील काकाणी कन्या विद्यालयात घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शारदोत्सवाला प्रारंभ करण्यात आला आहे. येथील पाच कंदील भागात आज पहाटे साडेपाच वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष रामनिवास सोनी यांच्या हस्ते शारदादेवीची पूजा करण्यात येऊन सवाद्य प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळा परिसरात रांगोळ्या व वृक्षकुंड्यांनी फेरीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यालयात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.