मालेगावी सिद्धी तपास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST2017-08-04T23:19:41+5:302017-08-05T00:21:42+5:30
मानवी जीवनात सात वचनांचे पालन केल्यास जीवन सार्थक ठरते व जीवनाचे कल्याण होते. धर्माचे आचरण शरीर व मनावर ठरते. पापाचा विचार मनात अगोदर येतो व नंतर शरीरामार्फत त्याचे पालन होते. सद्विचार विवेकबुद्धीने जीवनातील रहस्य उलगडते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा, सहज जीवन व्यतीत करा व आपला जन्म सार्थकी लावा, असे प्रतिपादन जैन साध्वी विक्रममाला म.सा. यांनी केले.

मालेगावी सिद्धी तपास प्रारंभ
मालेगाव कॅम्प : मानवी जीवनात सात वचनांचे पालन केल्यास जीवन सार्थक ठरते व जीवनाचे कल्याण होते. धर्माचे आचरण शरीर व मनावर ठरते. पापाचा विचार मनात अगोदर येतो व नंतर शरीरामार्फत त्याचे पालन होते. सद्विचार विवेकबुद्धीने जीवनातील रहस्य उलगडते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करा, सहज जीवन व्यतीत करा व आपला जन्म सार्थकी लावा, असे प्रतिपादन जैन साध्वी विक्रममाला म.सा. यांनी केले.
मानवी जीवनात चोरी, व्यसने, मांसाहार, मदिरा, जुगार यासारख्या गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करतात. या व्यसनांपासून सर्वांनी दूरच रहावे. जीवनात पैसा कमावणे पाप आहे; परंतु आयुष्य जगण्यासाठी पैसाच महत्त्वाचा ठरला आहे. या पापाचे प्रायश्चित्त दान करून करावे. सर्व प्रकारच्या दानाला मोठे महत्त्व आहे.सर्व प्रकारचे उपवास व सिद्ध तपासारख्या व्रतांमुळे मानवी जीवनात आत्म्यास सिद्धगती मिळते. त्यामुळे भरपूर उपवास, व्रत, तप, दान, धर्म करा व जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या, असे साध्वी विक्रममालाजी यांनी सांगितले. हा कार्यक्रम जैन उपाश्रममध्ये सुरू असून, यावेळी जैन समाजाच्या साध्वी यशोवर्म सुरीश्वरजी म.सा., विशिष्ट मालाजी यांच्यासह अनेक साध्वी उपस्थित होत्या. दि. २८ रोजी या सिद्धी तपाची सांगता करण्यात येणार असल्याचे समाजाचे अशोक कोठारी, दिलीप जैन, अमित संघवी यांनी सांगितले.