जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:22 IST2019-02-22T01:22:02+5:302019-02-22T01:22:32+5:30
सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेस सुरळीत प्रारंभ
सिन्नर येथील एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारात तपासणी करताना शिक्षक.
सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे यांनी दिली.
सिन्नर शहरात महात्मा फुले आणि वाजे विद्यालय अशा दोन कस्टडी असून, त्यांच्या अंतर्गत ७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. गटशिक्षण अधिकारी एस. जी. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. वाजे विद्यालयाअंतर्गत सिन्नर महाविद्यालय व दोडी विद्यालय या दोन केंद्रांचा समावेश आहे. या दोन केंद्रांवर एकूण २०८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, तर फुले विद्यालयाच्या कस्टडीअंतर्गत एस. जी. पब्लिक स्कूल, फुले विद्यालय, बारागाविपंप्री विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी आणि वडझिरे या पाच केंद्रांचा समावेश आहे. येथून ३०७१ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. शिक्षणविस्तार अधिकारी मंजूषा साळुंके आणि आर. बी. लहामगे या दोघांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ही भरारी पथके परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देणार आहे. त्यामुळे कॉपीबहाद्दरांवर वचक बसणार असला तरी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र ठेवण्यासाठी संचालकांनाही काळजी घ्यावी घेत आहेत.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एसजी पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७२ सिन्नर केंद्रावर बारावीची परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात सुरळीत सुरू झाली. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. त्यासाठी ७१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची चौकशी करून सोडले जात होते. कॉपीमुक्त वातावरणात पेपर लिहीत होते. संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या असून, केंद्र संचालक रघुनाथ एरंडे यांच्यासह शिक्षक कर्मचारी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहे.