वाजे विद्यालयात हरितकुंभ अभियानास प्रारंभ
By Admin | Updated: October 3, 2014 01:19 IST2014-10-03T01:19:08+5:302014-10-03T01:19:26+5:30
वाजे विद्यालयात हरितकुंभ अभियानास प्रारंभ

वाजे विद्यालयात हरितकुंभ अभियानास प्रारंभ
सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शिक्षण विभागाच्या हरितकुंभ अभियानास प्रारंभ करण्यात आला.नाशिक येथील कुंभमेळ्याच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळा परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. एस. खैरनार, उपमुख्याध्यापक आर. पी. म्हस्के, पर्यवेक्षक बी. आर. कहांडळ, आर. एस. रोठे, मनोहर कासार यांनी विद्यार्थ्यांना हरितकुंभ शपथ दिली. पर्यवेक्षक कहांडळ यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.