मुलींचे वसतिगृह सुरू करावे
By Admin | Updated: December 13, 2014 02:01 IST2014-12-13T02:01:40+5:302014-12-13T02:01:40+5:30
मुलींचे वसतिगृह सुरू करावे

मुलींचे वसतिगृह सुरू करावे
नाशिक जिल्'ातील अल्पसंख्याक बहुल मालेगाव व नांदगाव तालुक्यात आद्योगिक प्रशिक्षण संस्था पूर्ण क्षमतेने सुरू करावी तसेच अल्पसंख्याक समाजातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मंजूर असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली. तारांकित प्रश्नाव्दारे भुजबळ यांनी ही मागणी केली. यावेळी अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी खान्देश पॅकेजअंतर्गत सदरची दोन वसतिगृहे प्रस्तावित आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. जागा उपलब्ध नसल्यास विद्यापीठ किंवा शासकीय महाविद्यालयाच्या जागेत वसतिगृह बांधण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
..