गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांना प्रारंभ
By Admin | Updated: September 4, 2015 23:56 IST2015-09-04T23:56:27+5:302015-09-04T23:56:41+5:30
गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांना प्रारंभ

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांना प्रारंभ
इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीस वेग आला आहे. परिसरातील सर्व मंडळांच्या बैठका होऊन कार्यकारिणी निवडण्यास सुरुवात झाली आहे. दीड वर्षाने होणाऱ्या महापालिका निवडणुकीमुळे यंदाच्या श्री गणेशोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधण्याची पर्वणी साधणार आहेत. सिंंहस्थ पर्वणीमुळे शहरात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप टाकण्यापासून बंधने घालण्यात आली आहेत. परंतु इंदिरानगर, राणेनगर, विनयनगर, राजीवनगर, कमोदनगर, सार्थकनगर, पाथर्डी फाट्यासह परिसरातील मंडळांवर सिंहस्थ पर्वणीचा काही परिणाम होणार नसल्याचे दिसते. त्यामुळे यंदा येथे भव्य गणेशोत्सव साजरा होण्याची शक्यता
आहे. (वार्ताहर)