जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T22:45:43+5:302014-07-25T00:34:47+5:30

जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

Start of District Tennis Volleyball Championship | जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ

नाशिक : टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने आजपासून आयोजित जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या सदर स्पर्धेमध्ये डी. डी. बिटको, रुंगटा हायस्कूल, पेठे विद्यालय, टी. जे. चव्हाण हायस्कूल, शायनिंग स्टार स्कूल, नॅशनल स्कूल, देवळाली हायस्कूल, सॅक्रेट हार्ट स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, र. ज. चव्हाण हायस्कूल, देवळाली हायस्कूल, के. के. वाघ स्कूल, माध्यमिक विद्यालय एकलहरा, पुष्पावती कन्या शाळा, डे केअर स्कूल, बिटको महाविद्यालय, एस.व्ही.के.टी. महाविद्यालय, देवळाली कॅम्प कनिष्ठ महाविद्यालय आदि संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन कालिका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व माजी व्हॉलीबॉल खेळाडू दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक दुधारे, बबन बोडके, बाळासाहेब रणशूर, आनंद खरे, स्वप्नील कर्पे आदि उपस्थित होते. स्पर्धेचा समारोप येत्या रविवारी होणार असून, याच स्पर्धेतून जळगाव येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुला-मुलींचा जिल्हा संघ निवडला जाणार
आहे.

Web Title: Start of District Tennis Volleyball Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.