डिकॅथॅलॉनच्या क्रीडा साहित्य मॉलचा प्रारंभ
By Admin | Updated: August 2, 2014 01:25 IST2014-08-02T00:07:04+5:302014-08-02T01:25:48+5:30
डिकॅथॅलॉनच्या क्रीडा साहित्य मॉलचा प्रारंभ

डिकॅथॅलॉनच्या क्रीडा साहित्य मॉलचा प्रारंभ
नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रें च येथील डिकॅथॅलॉन कंपनीच्या मॉलचा नाशिक परिसरातील विल्होळी येथील जैन मंदिरासमोर आज प्रारंभ झाला़ खास क्रीडा साहित्यासाठी असलेला हा महाराष्ट्रातील तिसरा मॉल आहे़
उद्योजक प्रकाश चौधरी यांच्या हस्ते फ ीत कापून मॉलचे उद्घाटन झाले़ हा उद्घाटन सोेहळा तीन दिवस चालणार असून, यानिमित्त नाशिककरांसाठी झुंब्बा डॉन्स, तायक्वान्दो कराटे कार्यशाळा, सायकलिंग, स्विमिंग अशा विविध उपक्रमांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे़ याबाबत माहिती देताना मॉलचे अॅनी जॉर्ज व व्यवस्थापक कुणाल धनंवत यांनी सांगितले, या मॉलमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४० पेक्षा अधिक खेळांचे बूट, कपड्यांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य एका छताखाली व रास्त कि मतीत उपलब्ध आहे़ खेळातील नवीन खेळाडू ते आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी आवश्यक असणारे व संशोधन करून त्यामध्ये नावीन्य असलेले क्रीडा साहित्य मिळणार आहे़ यासह ट्रेकिंग, फि शिंग, व्यायामाचे साहित्य, सायकलिंग तसेच पर्यटकांसाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे़ लहान मुलांना छोट्या जागेत खेळ खेळता यावेत यासाठी सहज जोडता येईल अशा नेट, खेळाच्या सरावाचे साहित्य, एक मिनिटात तयार करता येणारा तंबू असे अनोखे साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे़ मॉलमध्ये प्रत्येक क्रीडा साहित्य विक्रीच्या ठिकाणी त्या-त्या खेळातील अनुभवी व्यक्ती तसेच खेळाडू माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत़ ते आपली गरज पाहून त्या प्रकारचे क्रीडा साहित्य खरेदीसाठी सहकार्य करणार आहेत़ प्रत्येक वस्तूवर दोन वर्षांची गॅरंटी असून, या कालावधीत वस्तूस काही झाल्यास कंपनी ती बदलून देणार आहे़