कॅन्टोनमेंट हाॅस्पिटल सर्व सामान्यांसाठी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:07+5:302021-02-05T05:40:07+5:30

यासंदर्भात कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या ...

Start Cantonment Hospital for all commoners | कॅन्टोनमेंट हाॅस्पिटल सर्व सामान्यांसाठी सुरू करा

कॅन्टोनमेंट हाॅस्पिटल सर्व सामान्यांसाठी सुरू करा

यासंदर्भात कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या १० महिन्यांपासून छावणी रुग्णालय कोविड सेंटर म्हणून कार्यरत आहे. तेथे फक्त कोरोना रुग्णांवर उपचार होतात. मात्र, इतर आजारांवरील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कॅन्टोनमेंट हाॅस्पिटल सर्व सामान्य रुग्णांकरिता सुरू करावे व देवळाली कॅम्प तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठ-दहा दिवसांत छावणी रुग्णालय सर्व सामान्य रुग्णांना पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी आरपीआयचे सिद्धार्थ पगारे, राजेंद्र जाधव, अशोक साळवे, गौतम भालेराव, अनिल ढेंगळे, राकेश भालेराव, संजय मोरे, हिरामण जाधव, राजू कांबळे, प्रकाश किरवे आदी उपस्थितीत होते.

Web Title: Start Cantonment Hospital for all commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.