द्राक्षमणी लिलावास प्रारंभ
By Admin | Updated: January 18, 2016 22:25 IST2016-01-18T22:24:46+5:302016-01-18T22:25:28+5:30
द्राक्षमणी लिलावास प्रारंभ

द्राक्षमणी लिलावास प्रारंभ
वडनेरभैरव : येथील उपबाजारात द्राक्षमणी लिलावास सुरुवात
करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव वक्टे होते. माजी सरपंच डी. एल. पाचोरकर यांच्या हस्ते द्राक्षमणी लिलाव सुरू करण्यात आले.
व्यासपीठावर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, पंढरीनाथ खताळ, संचालक विलासदादा ढोमसे, पूजा ठाकरे, सुरेश जाधव, विक्रम मार्कंड, चंद्रकांत व्यवहारे, बबनराव पूरकर, शांताराम ठाकरे, सचिव आर. बी. वाघ, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश
साळुंके, विजय पूरकर, अनिल पवार, संपतबाबा वक्टे, बाळासाहेब वाघ, उत्तम वक्टे, शरद काळे, सुभाष माळी उपस्थित होते.
वडनेरभैरव येथे सुरू करण्यात आलेला उपबाजार हा शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आला
आहे, असे डॉ. कुंभार्डे यांनी
सांगितले. (वार्ताहर)