्नरासबिहारी क्रिकेट करंडक स्पर्धांना प्रारंभ
By Admin | Updated: November 16, 2014 00:54 IST2014-11-16T00:54:48+5:302014-11-16T00:54:48+5:30
्नरासबिहारी क्रिकेट करंडक स्पर्धांना प्रारंभ

्नरासबिहारी क्रिकेट करंडक स्पर्धांना प्रारंभ
नाशिक : रासबिहारी इंटनॅशनल स्कूल व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रासबिहारी करंडक क्रिकेट स्पर्धेस आजपासून प्रारंभ झाला़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचे नानेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन झाले़ यावेळी क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे, रासबिहारी स्कूलच्या मुख्याध्यापक शिल्पा आहिरे आदि उपस्थित होते़ यावेळी उपस्थितांच्या हस्ते या करंडकाची माहिती देणाऱ्या रासबिहारी हायलाईटस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़ आज या स्पर्धेतील पहिला रासबिहारी स्कूलविरुद्ध स्वामी नारायण स्कूल यांच्यात सुरू झाला; परंतु पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही़ त्या पुढील डॉन बास्को विरुद्ध आऱ पी़ विद्यालय , सेंट लॉरेन्स विरुद्ध अशोका चांदसी आणि होरायझन विरुद्ध गुरूगोविंद स्कूल हे सर्व सामने पावसामुळे रद्द करण्यात येऊन त्यांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला़