‘साहेब’ मोबाइलशी खेळण्यात दंग
By Admin | Updated: May 20, 2014 23:56 IST2014-05-20T23:56:48+5:302014-05-20T23:56:48+5:30
मनमाड शहरातील गाºहाणे मांडण्यासाठी नागरिकांनी पालिका कार्यालयात धाव घेत अधिकार्यांना जाब विचारला.

‘साहेब’ मोबाइलशी खेळण्यात दंग
गिरीश जोशी ल्ल मनमाड मनमाड शहरातील नागरी प्रश्नांबाबत गाºहाणे मांडण्यासाठी संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी पालिका कार्यालयात धाव घेत उपस्थित अधिकार्यांना जाब विचारला मात्र, ‘साहेब’ मोबाइलशी खेळण्यात दंग असल्याने नागरिकांच्या संतापाचा पारा अधिकच वाढला. नागरिकांचा जीव जातो... अन् साहेब मोबाइलशी खेळतो... अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील आरोग्य, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून, या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयात धाव घेतली. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने समस्या मांडाव्या कोणाकडे, असा प्रश्न या नागरिकांना पडला. बराच वेळ वाट पाहून वैतागलेल्या या नागरिकांचा संतापाचा पारा अनावर झाला. यावेळी जे अधिकारी उपस्थित होते त्यांच्यापुढे समस्या मांडण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केला खरा; मात्र साहेब मोबाइलशी खेळण्यात व्यस्त असल्याने या संतापलेल्या नागरिकांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली. पाणी, आरोग्य व अन्य समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना पोटतिडकीने मांडणार्या या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा जीव जातो अन.... साहेबाचा मोबाइल खेळ होतो... याचा प्रत्यय आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अखेर नगराध्यक्ष गणेश धात्रक हे पालिका कार्यालयात दाखल झाले. त्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या व आपण स्वत: या प्रश्नांकडे लक्ष घालून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पारीक, एस.एम. भाले, राजकमल पांडे, विष्णू चव्हाण, नीलेश व्यवहारे, निर्मल भंडारी, विजय बोरसे, गौतम कर्डक आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.