स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?
By Admin | Updated: October 9, 2015 01:11 IST2015-10-09T01:10:26+5:302015-10-09T01:11:47+5:30
स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?
नाशिक : नुकत्याच झालेल्या सिंहस्थ कुंभमेळादरम्यान साधुग्राममधील महापालिकेच्या ठेक्याबाबत ई-निविदा पद्धतीबाबत मोहोळ उठल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या तीन कोटी रुपयांच्या सौर पथदीप खरेदीचा ठेकाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील जवळपास ३०० ग्रामपंचायतींमध्ये सौर पथदीप पुरवठा करण्याची योजना असून, त्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच दरकरार पद्धतीने राजस्थानच्या एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. प्रत्यक्षात राजस्थानच्या जयपूरस्थित संबंधित कंपनीने वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने पाच महिन्यांनंतर या कंपनीचा दरकरार संपुष्टात आणून नव्याने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांतील व महाराष्ट्रातील पाच बड्या कंपन्यांनी यासाठी स्पर्धा केली. त्यात गुजरात स्थित एका कंपनीने चक्क अंदाजपत्रकीय रक्कमेच्या २८ टक्केन्यूनतम दराने निविदा भरल्याने याच कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा ठेका मिळणार हे जवळपास नक्की झाले.