शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आमदारांंच्या महिला रुग्णालयाचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:14 IST

भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब केला.

नाशिक : भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब केला.  आमदार फरांदे यांनी महिला रुग्णालयासाठी निधी मंजूर करून आणल्यानंतर ते भाभानगर येथे म्हणजेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाजूच्या जागेत करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यास भाजपाचेच प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचा विरोध होता. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर टाकळी येथील जागा महापालिकेने सुचवली होती, मात्र फरांदे यांनी भाभानगर येथील जागेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता अखेरीस शासकीय निधीतून आणि संपूर्णत: शासकीय दायित्व असलेला हा प्रस्ताव चर्चेसाठी आल्यानंतर दिनकर पाटील आणि मुशीर सय्यद यांनी त्यांचे समर्थन केले, परंतु शिवसेनेच्या प्रवीण तिदमे आणि भागवत आरोटे यांनी त्यास विरोध केला. दादासाहेब गायकवाड सभागृहाची पार्किंग ज्या जागेत आहे, त्याच ठिकाणी अशाप्रकारचे रुग्णालय उभारल्यानंतर वाहनतळाचे काय होणार त्याचप्रमाणे सदरच्या जागेत असलेले पूर्वीचे आरक्षण बदलण्यात आले आहे काय? असे प्रश्न विचारतानाच सदरचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबतदेखील त्यांनी विचारणा केली. जागेवरील आरक्षणाबाबत नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना थेट उत्तर देता न आल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खुलासा करताना या जागाचे आरक्षण बदलण्यात आले असून त्यात रुग्णालय उभे राहू शकतो. गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी मान्य करतानाच रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीत वाहनतळासाठी आवश्यक ती जागा असल्याचेदेखील स्पष्ट केले. मात्र आयुक्तांच्या या खुलाशानंतरदेखील शिवसेनेच्या सदस्यांनी याबाबत माहिती घेतली पाहिजे तसेच चौकशीदेखील करणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर हा प्रस्ताव आडके यांनी स्थगित केला. दरम्यान, अंगणवाडीतील सुविधांवरून नगरसेवकांनी चर्चा केली.पाटील-हिमगौरी आडके यांची खडाजंगीभाभानगर येथील महिला रुग्णालयाच्या विषयावरून दिनकर पाटील यांनी गंगापूर येथील रुग्णालये बंद का? असा प्रश्न करणाऱ्या दिनकर पाटील यांना सभापती हिमगौरी आडके यांनी थांबवण्याचा आणि तिदमे यांना बोलण्याचा इशारा केल्याने पाटील संतप्त झाले आणि त्यांनी आडके यांच्यावर रोष व्यक्त केला. आपण जनतेच्या कामांचेच बोलत असताना कशासाठी थांबवतात? असा प्रश्न करीत तुम्ही काल परवा पदावर निवडून आल्या आहेत, आमचे आयुष्य चालले आहे, तुमच्या एवढी मला मुलगी आहे. पदाचा नाही तर वयाचा तर मान राखत जा असे समितीत सुनावल्याने सारेच आवाक झाले. मात्र, आडके यांनी शांततेत सभापती म्हणून मलाच अधिकार आहेत तसेच समितीत सर्वांनाच समान संधी द्यावी लागते असे सांगितले, परंतु पाटील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी सभात्याग केला, परंतु जाताना आता तुमच्या चौकशाच लावतो, असा इशाराही दिला.समितीत मंजूर ठळक विषयअधिकाºयांच्या वित्तीय अधिकारात वाढ.पंचवटी- सातपूर विभागातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयेगंगापूर धरणावर पंप सेट बसवण्यासाठी २ कोटी ६३ लाख.सातपूर विभागात मलवाहिका टाकण्यासाठी १८ कोटी ३४ लाख.पंचवटी विभागात मलवाहिकांच्या कामांसाठी १६ कोटी ५२ लाख.आयुक्त स्थायीला पावलेविविध कामांच्या कंत्रांटाचे विषयच नसल्याने अनेकदा स्थायी समितीची बैठक होत नाही अशी स्थिती असताना शुक्रवारी (दि.२१) समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांचे विषय मांडण्यात आले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदार