शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या  सदस्यांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:57 IST

महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आठ ऐवजी सात सदस्यांची निवड विशेष महासभेत होणार आहे. दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे. भाजपाचे चार सदस्य अगोदरच राजीनामा देत नसताना आता नवीन सदस्य निवडण्यासाठीदेखील जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपाचे संघटनमंत्री किशोर काळकर हे सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. यात सदस्यपदासाठी गटनेता संभाजी मोरूस्कर, गणेश गिते, कमलेश बोडके यांची पूर्व नाशिक मतदारसंघातून, मध्यमधून स्वाती भामरे व सतीश सोनवणे आणि पश्चिममधून वर्षा भालेराव यांची नावे चर्चेत होती. तीन आमदारांना भाजपा कोटा पद्धतीने संधी देत असला तरी पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील निर्णायक ठरणार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.शिवसेनेच्या वतीने इच्छुकांची नावे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना सादर करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी मुंबईहून लखोटा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या एका सदस्याचे नाव स्थानिक स्तरावरूच ठरणार असल्याचे वृत्त आहे.आमदारांची परीक्षास्थायी समिती सदस्यत्वासाठी मोजक्याच सदस्यांची नावे अंतिम टप्प्यात असली तरी भाजपात मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. विविध समित्यांची पदे भूषविणाऱ्यांना पक्षाने बाद ठरविले असले तरी इच्छुकांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक