जलसंधारणसह स्थायी समितीही तहकूब

By Admin | Updated: June 20, 2014 01:18 IST2014-06-20T00:46:42+5:302014-06-20T01:18:39+5:30

नाशिक : जलसंधारणसह स्थायी समितीही तहकूब

Standing committee adjourned with water conservation | जलसंधारणसह स्थायी समितीही तहकूब

जलसंधारणसह स्थायी समितीही तहकूब

नाशिक : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे तसेच माजी पंचायत समिती सभापती केरूनाना चुंबळे व जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ यांचे वडील शंकरराव फडोळ यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदेची जलसंधारण समितीची तसेच स्थायी समितीची मासिक बैठक तहकूब करण्यात आली.
अध्यक्ष जयश्री पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही मासिक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोपीनाथ मुंडे, केरूनाना चुंबळे व शंकरराव फडोळ यांना श्रद्धांजली वाहून सकाळी जलसंधारण समितीची व दुपारी स्थायी समितीची मासिक बैठक तहकूब करण्यात आली. बैठकीस उपाध्यक्ष संपतराव सकाळे, सभापती राजेश नवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, सदस्य केदा अहेर, प्रवीण जाधव, गोरख बोडके आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Standing committee adjourned with water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.