स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

By Admin | Updated: August 4, 2014 02:08 IST2014-08-04T02:03:13+5:302014-08-04T02:08:53+5:30

स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

Standing chairman .. he is new ... he is ... | स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या हाती आर्थिक नाड्या असल्या, तरी समितीच्या सभापतीने थेट महापौरच झाल्याच्या थाटात वावरायचे नसते, याचे धडे बहुधा यापूर्वी शहराच्या प्रथम नागरिकाचे पद भूषविणाऱ्या पित्याने आपल्या बाळराजेंना दिले नसावे. म्हणूनच की काय सभापतीने पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा करत थेट महापौरांनाच आव्हान दिले. परंतु पालिकेच्या राजकारणात मळलेल्या वाटेवर चालत सर्वाेच्च पदावर जाऊन पोहोचलेल्या महापौरांनीही ‘नया है वह...’ असे म्हणत पाणीपुरवठ्याबाबत सोमवारी (दि. ४) आपल्या दालनात आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पाणीकपात रद्दचा अधिकृत निर्णय महापौरांच्या घोषणेनंतरच जारी होईल.
गेल्या आठवड्यात वरुणराजाने दाखविलेल्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सुमारे ८५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर महापालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी महापौरांना अंधारात ठेवत आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन पाणीकपात रद्दची मागणी केली आणि लगोलग पाणीकपात रद्दची घोषणाही करून टाकली. स्थायी समितीच्या सभापतींनी जाहीर केलेल्या या निर्णयाची महापौरांसह पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता रमेश पवार यांना सुतराम कल्पनाही नव्हती. पवार यांनी याबाबत आयुक्तांकडे केवळ चर्चा झाल्याचे सांगितले, तर महापौरांनी याबाबत बैठक घेऊन दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकारामुळे मनसेतीलच पदाधिकाऱ्यांमध्ये असमन्वयाचे दर्शन तर घडलेच; परंतु स्थायी सभापतींनी महापौरांचे अधिकार आपल्या हाती घेण्याचा आगंतुकपणाही दाखविल्याने राहुल ढिकले हे मनोरंजनाचा आणि चर्चेचा विषय बनले. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण कोण आहोत आणि आपले नेमके काय अधिकार आहेत, ह्याची समज नसल्याने हा सारा घोटाळा झाला. स्थायी समिती सभापतीचा रुबाब भारी, त्यांचा खजिना भारी, पण आपलं सगळंच लई भारी असे म्हणून कसे चालेल? महापौरांनी मात्र सभापतीकडे दुर्लक्ष करतानाच ‘नया है वह...!’ म्हणत सोमवारी पाणीपुरवठ्याची बैठक बोलावून आपणच ‘लई भारी’ असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचा बदला आता बाळराजे आपल्या सोळा खांबी तंबूत कसा घेतात, याकडे पालिका वर्तुळात सर्वांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Standing chairman .. he is new ... he is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.