शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाहनचालकांच्या जीवाशी खेळ थाटली दर्जाहीन हेल्मेटची दुकाने....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:05 PM

पिंपळगाव बसवंत : वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीकेल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोलिसांकडून कारवाई सुरू झाली असून, त्यात ५०० रु पये दंड भरण्यापेक्षा नागरिक शे-दोनशे रु पयाचे हेल्मेट विकत घेत आह,े त्यामुळे हलक्या आणि जीवघेण्या हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : अपघातांपासून नव्हे,पोलिसांपासून बचाव करणाऱ्या हेल्मेटची सर्रास विक्र ी...

पिंपळगाव बसवंत : वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीकेल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोलिसांकडून कारवाई सुरू झाली असून, त्यात ५०० रु पये दंड भरण्यापेक्षा नागरिक शे-दोनशे रु पयाचे हेल्मेट विकत घेत आह,े त्यामुळे हलक्या आणि जीवघेण्या हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.गल्लो-गल्लीत, महामार्गालगत हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्याची संरक्षण करणे ऐवजी फक्त पोलिसांपासून बचाव करीत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे वाहन चालकांच्या जीवाशी खेळणारा धंदा सुरू असून नागरिकांनी हेल्मेट घेताना चांगल्या प्रतीचे आणि आयएसआय ट्रेडमार्कस्असलेले हेल्मेट घेणे गरजेचे आहे. पिंपळगाव बसवंत शहरातील व परिसरातील अनेक वाहनचालकांच्या डोक्यात केवळ हलक्या दराचे व निकृष्ट हेल्मेट दिसत आहे. फक्त पोलिस दिसतातच ते डोक्यात घ्यालायचे व नंतर मोटार सायकलच्या हेंडेलला अडकावयाचे फक्त दंडात्मक कारवाई करू नये म्हणून ते हेल्मेट घालताना दिसत आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक रस्त्यावरून हेल्मेट विकत घेतात, त्या हेल्मेटवर होलोग्राम नसतो प्लास्टिक पासून बनवलेले हलक्या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्र ीस उपलब्ध असतात. १०० रु पयांपासून १००० हजार रु पयांपर्यंत हे हेल्मेट विकली जातात.रस्त्यावरील हेल्मेट विक्र ेते बिल किंव्हा त्या हेल्मेटची वारंटी देत नाही त्यामुळे वजनाने हलके आणि निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक वापरलेल्या हेल्मेट विक्र ीचे प्रमाणही जास्त आहे. हातातून खाली पडल्यानंतर अशा हेल्मेटला तडे जाऊ शकतात, मग असे हेल्मेट अपघात प्रसंगी काय सुरक्षा करणार.! फक्त पोलिसांची पावती चुकवण्यासाठी रस्त्यावरील हलक्या दर्जाचे हेल्मेट घालण्यास वाहन चालक पसंती देत आहे. त्यामुळे आयएसआय ट्रेडमार्कस्च्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर गर्दी वाढत आहे. हेल्मेट खरेदी करतांना वाहनचालकानी केवळ वाहतूक पोलिसांची भीती मनात न बाळगता आपल्या जीवाचा विचार करणे गरजेचे आहे.हेल्मेट खरेदीचे असेही वास्तव्य रस्त्यावरील विक्र ेत्यांकडे १५० रु पये पासून ते ५०० रु पये पर्यंत हेल्मेट विक्र ीसाठी उपलब्ध आहेत तर दंडाची पावती पाचशे रु पयाची आहे त्यामुळे दुचाकीस्वार दोनशे रु पयाची निकृष्ट दर्जाचे हेल्मेट खरेदी करत आहे.एका तरु णां सोबत संवाद साधला असता तो तरु ण म्हणाला कि. मी. १५० रु पयाला हेल्मेट घेतले, आणि हेल्मेट नसल्याचा दंड ५०० रु पये आहे मग माङया या हेल्मेट मुळे माझे ३५० रु पये बचत झाले आहे असे तो तरु ण बोलला मग शेवटी या प्रसंगावरून नागरिकांनादेखील साधी व सोपी पद्धत शोधून काढल्याचे चित्र दिसून येत आहे.अपघातांपासून वाहन धारकांचा बचाव होण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली हे खुप चांगले झाले. पण नागरिक त्या हेल्मेट सक्तीला प्रतिसाद देत आहे, असे पोलीस प्रशासनाला वाटत आहे. पण हा प्रशासनाचा भ्रम आहे. कारण वाहन धारक हेल्मेट डोक्यात न घालता गाडीला अडकवित असल्याचे चित्र दिसत आहे. आणि त्यातच रस्त्यावर विकल्या जाणाºया निकृष्ट हेल्मेट दुकानांचे प्रमाण देखील वाढले आहे. मग यावरच पोलिसांची किती सतर्कता आहे ती दिसून येते.- निलेश पाटील,शिवसेना, उपजिल्हा प्रमुख,पिंपळगाव बसवंत.पोलीस प्रशासन फक्त हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना पकडतात पण अशा हेल्मेट विक्र ी करणाºयांना अभय का देतात हेच कळतं नाही. हेल्मेट सक्ती जर वाहनधारकाच्या फायद्यासाठी केली आहे तर मग वाहन धारक जर अश्या निकृष्ट दर्जाचे हेल्मेट परिधान करत असेल तर या हेल्मेटच्या सक्तीचा काय उपयोग, हि हेल्मेट सक्ती म्हणायची कि पैसे कमावण्याची संधी.- प्रकाश लोंढेबसपा, पिंपळगाव बसवंत.हेल्मेट सक्ती जर सुरक्षतेसाठी केली आहे, तर मग त्यांची अंमलबजावणी देखील त्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. फक्त वाहनधारकांकडून दंडात्मक पावती घेणे गरजेचे नसून निकृष्ट दर्जाच्या हेल्मेट बाबत जनजागृती करून ते हेल्मेट किती सरुक्षित आहे, ते देखील बघणे गरजेचे आहे.- अजित कराटेपिंपळगाव बसवंत.