ंफ्लॅटधारकांना दहा लाखांना गंडा

By Admin | Updated: July 3, 2017 00:50 IST2017-07-03T00:50:33+5:302017-07-03T00:50:50+5:30

फसवणूक करणाऱ्या जागेचे मूळ मालक तसेच बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stakeholders pay ten lakhs | ंफ्लॅटधारकांना दहा लाखांना गंडा

ंफ्लॅटधारकांना दहा लाखांना गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी: धुळे जिल्ह्यातील श्री समर्थ पतसंस्थेचे कर्ज घेऊन जागा, फ्लॅट विक्री करताना सदनिकेच्या सभासदांना जमिनीवरील बोजा न दाखवता कोरा सातबारा देऊन तब्बल बारा सभासदांची फसवणूक करणाऱ्या महात्मानगर येथील जागेचे मूळ मालक तसेच दिंडोरी रोडवरील कलानगर येथे राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृतधाम येथील अमोल रमेशसिंह परदेशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. परदेशी व त्यांच्यासह एकूण बारा सदस्यांनी अमृतधाम येथील सर्व्हे क्रमांक २६१/३ अ व २६१/३ ब येथे बांधकाम केलेल्या सदनिकेत फ्लॅट विकत घेतले होते. धुळे येथील श्री समर्थ पतसंस्थेने या इमारतीतील सदस्यांना जप्तीची नोटीस पाठविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ महात्मानगर मॉर्निंग ग्लोरी अपार्टमेंट येथील जागा मालक नरेंद्र पोपट पगार यांनी काही वर्षांपूर्वी धुळे येथील श्री समर्थ पतसंस्थेकडून दहा लाख रु पये कर्ज घेतले होते. त्यानंतर २००३ ते २०१३ या कालावधीत त्यांनी दिंडोरी रोडवरील कलानगर येथे राहणाऱ्या दिनेशभाई अर्जुनभाई पटेल यांना ही जागा विकासासाठी दिली. या जागेवर सदनिका उभारल्यानंतर तक्र ारदार परदेशी यांनी व अन्य नागरिकांना फ्लॅट विक्र ी केली व फ्लॅट विक्री करताना जमिनीवरचा बोजा न दाखवता कोरा सातबारा दिला. सदनिकेत सभासद राहायला गेल्यानंतर पतसंस्थेने सभासदांना जप्तीची नोटीस बजावली असता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परदेशी यांच्यासह सभासदांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर आडगाव पोलिसांत जागेचा मूळ मालक पगार व बिल्डर पटेल या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टीधारकांना बनावट दस्ताऐवज करून लुटण्याचे अनेक प्रकार शहरात घडले असून, यात अनेक शासकीय यंत्रणाही गुंतल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Stakeholders pay ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.