विहितगाव येथे काकाकडून पुतण्यास मारहाण
By Admin | Updated: January 10, 2016 23:39 IST2016-01-10T23:39:22+5:302016-01-10T23:39:48+5:30
विहितगाव येथे काकाकडून पुतण्यास मारहाण

विहितगाव येथे काकाकडून पुतण्यास मारहाण
नाशिकरोड : विहितगाव बागुलनगर येथे काकाने पुतण्याच्या पायावर लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहितगाव बागुलनगर येथील दीपक दगडू तेलोरे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास बागुलनगरच्या कडेला उभे असताना विनायक काशीनाथ तेलोरे यांनी जवळ बोलवून घेतले. तसेच जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालून रिक्षातून लोखंडी रॉड काढून दीपकच्या डाव्या पायावर मारून दुखापत केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)