ढिकले-हिरे पॅनलचे एकत्रीकरण? दुरंगीच होणार लढत

By Admin | Updated: April 15, 2015 00:05 IST2015-04-15T00:04:39+5:302015-04-15T00:05:07+5:30

जिल्हा बॅँक निवडणूक : २१ ला निवडणूक कार्यक्रम शक्य

Stack-diamond panel aggregation? Will fight for a long run | ढिकले-हिरे पॅनलचे एकत्रीकरण? दुरंगीच होणार लढत

ढिकले-हिरे पॅनलचे एकत्रीकरण? दुरंगीच होणार लढत

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे येत्या २१ किंवा २२ एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता असून, पूर्वी होणारी तिरंगी लढत आता दोन पॅनलमध्ये दुरंगी होण्याची शक्यता वाढली आहे. उत्तमराव ढिकले यांच्या निधनामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांच्याकडे ढिकले पॅनलचे नेतृत्व जाण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे बंधूंचे होऊ घातलेले तिसरे पॅनल कदाचित आता ढिकले पॅनलशी समन्वय साधून एकच पॅनल तयार करण्याच्या हालचाली तीव्र झाल्याचे समजते. त्यामुळे कदाचित ढिकले-हिरे यांचे एकच पॅनल होण्याची शक्यता त्यामुळे वर्तविण्यात येत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि. १०) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम पारूप मतदार यादी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याचे संकेत असल्याने येत्या २१ किंवा २२ एप्रिल रोजी जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

Web Title: Stack-diamond panel aggregation? Will fight for a long run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.