एस.टी. महामंडळाकडून ग्रुप बुकिंगची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 21:11 IST2020-05-10T21:10:58+5:302020-05-10T21:11:20+5:30
नांदगाव : राज्य परिवहन महामंडळाने कोरोना लॉकडाउनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी नांदगाव आगार तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ग्रुप बुकिंगची व्यवस्था केलेली आहे.

एस.टी. महामंडळाकडून ग्रुप बुकिंगची व्यवस्था
ठळक मुद्देफक्त २१ प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास
नांदगाव : राज्य परिवहन महामंडळाने कोरोना लॉकडाउनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी नांदगाव आगार तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ग्रुप बुकिंगची व्यवस्था केलेली आहे.
प्रवासासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असून, सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, शासनाचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड गरजेचे आहे. शेवटच्या थांब्याशिवाय कुठेही उतरता येणार नाही. एका बसमध्ये फक्त २१ प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करता येईल.