त्र्यंबकेश्वर : जुना अखाडा श्रीगोरक्षनाथ मठ आदी अनेक अखाड्यात भगवान श्रीरामाची पुजा करण्यात येउन एकच जल्लोष केला. सागरानंद सरस्वती आश्रमात आनंद अखाड्याचे महंत सागरानंद सरस्वती, श्री स्वामी शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, श्रीगणेशानंद सरस्वती केशवानंद सरस्वती, सर्वानंद सरस्वती आदींनी जल्लोष केला. यातीलच श्री शंकरानंद सरस्वती यांचे प्रतिनिधी गिरजिानंद सरस्वती अयोध्या येथे शिलान्यास सोहळ्यासाठी अयोध्या येथे सहभागी झाले आहेत. बेझे येथील श्रीराम शक्ती पिठाचे पिठाधिश्वर श्रीश्री १००८ स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या आश्रमात भगवान श्रीरामाची हनुमानाची पुजा करण्यात आली. तसेच सर्वांनी भगवान श्रीरामाचा जल्लोष करण्यात आला. थोडक्यात त्र्यंबकेश्वर व परिसरात अयोध्येतील श्रीराम मंदीराच्या जल्लोषाचे पडसाद सर्व भारतासह त्र्यंबकेश्वर मध्येही उमटले.
श्रीस्वामी सागरानंद सरस्वती आश्रम,अखाड्यात भगवान श्रीरामाची पुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:30 IST
त्र्यंबकेश्वर : जुना अखाडा श्रीगोरक्षनाथ मठ आदी अनेक अखाड्यात भगवान श्रीरामाची पुजा करण्यात येउन एकच जल्लोष केला. सागरानंद सरस्वती आश्रमात आनंद अखाड्याचे महंत सागरानंद सरस्वती, श्री स्वामी शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, श्रीगणेशानंद सरस्वती केशवानंद सरस्वती, सर्वानंद सरस्वती आदींनी जल्लोष केला.
श्रीस्वामी सागरानंद सरस्वती आश्रम,अखाड्यात भगवान श्रीरामाची पुजा
ठळक मुद्देअयोध्येतील श्रीराम मंदीराच्या जल्लोषाचे पडसाद सर्व भारतासह त्र्यंबकेश्वर मध्येही उमटले.