श्रीनिवास एअरलाइन्सच्या विमानसेवेची चाचणी

By Admin | Updated: July 10, 2015 23:46 IST2015-07-10T23:45:34+5:302015-07-10T23:46:16+5:30

सोमवारपासून सेवा : मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

Srinivas Airlines's flight test | श्रीनिवास एअरलाइन्सच्या विमानसेवेची चाचणी

श्रीनिवास एअरलाइन्सच्या विमानसेवेची चाचणी

नाशिक : नाशिक-पुणे विमानसेवेला प्रारंभ होताच अशा प्रकारची नाशिक- मुंबई- पुणे सेवा सुरू करण्याची घोषणा करणाऱ्या श्रीनिवास एअरलाइन्स या कंपनीने मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेची चाचणी घेऊन शुभारंभ केला. येत्या सोमवारपासून ही सेवा सुरू होणार आहे.
वर्षभरापासून वापराविना पडून असलेल्या ओझरच्या विमानतळावर आता मेहेर पाठोपाठ श्रीनिवासही सेवा सुरू झाल्याने वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ओझर विमानतळवर श्रीनिवास एअरलाइनच्या या सेवेचा शुभारंभ श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनी, खासदार हेमंत गोडसे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंह, भाजपा नेते सुनील बागुल आदिंच्या हस्ते पूजा करून विमानसेवेचे उद््घाटन करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांना घेऊन वैमानिक अमित कुमार आणि सहवैमानिक जयकांत यांनी ओझर विमानतळ परिसरात हवाई सफर केली.
सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानातून सोमवार ते शनिवार दैनंदिन स्तरावर वाहतूक केली जाणार असून कंपनीच्या वतीने शिर्डी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळ आणि अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी श्रीनिवास एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक गणेश टिबे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Srinivas Airlines's flight test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.