श्रीपंच दशमान जुना आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा
By Admin | Updated: May 29, 2015 00:05 IST2015-05-28T23:32:40+5:302015-05-29T00:05:40+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरातून साधू-महंतांची मिरवणूक

श्रीपंच दशमान जुना आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा
त्र्यंबकेश्वर : येथील दहा आखाड्यांपैकी श्रीपंच दशनाम जुना आखाडा गुरुगादी रमता पंच आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा गुरुवारी पार पडला.
त्र्यंबकेश्वर शहरातर्फे त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष अलका शिरसाट यांच्या हस्ते शंकराचार्य जगदगुरु अनन्त श्रीविभूषित स्वामी नरेद्रचंद्र सरस्वती महाराज उर्ध्वानाथ, श्रीक्षेत्र काशी सुमेरु पीठाधीश्वर श्रीशंकरानंद महाराज महामंडलेश्वर माटुंगा-मुंबई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो साधू-महंत, भक्तगण, आखाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशहरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा रात्री ८.१५ च्या सुमारास पार पडला. हा आखाड्याच्या पिंपळद येथील आश्रमातून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत पाटी मिरवणुकीने शहरात आगमन झाले. या मिरवणुकीत आखाड्याच्या इष्टदेवता, भाल्यांच्या स्वरूपात होत्या. आखाड्याची इष्टदेवता गुरुदत्तात्रय, तसेच ध्वजा रात्री सामुग्री घेऊन महात्मा-साधु चालत होते. चातुर्मास सुरु होण्यापूर्वी आज नगरप्रवेश करण्यात आला. या अखाड्याच्या संबंधीत शंकराचार्य चातुर्मासात गोदावरी ओलांडीत नाही. त्यामुळे चातुर्मासापूर्वीच शहरात प्रवेश करून घेतला. गंगा दशहाराच्या दिवशी अखाड्याच्या प्रमुखांची शहर प्रवेश करण्याची इच्छा होती.
पिंपळदपासून निवांत जागी हा आश्रम असून अखाड्याच्या मालकीची सुमारे ४० ते ५० एकर जमीन आहे. त्या ठीकाणापासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत अंब७री रस्ता, फिल्टर प्लॅन्टपासून स्वतंत्र पाईपलाईन, पाण्याची टाकी अशा सुविधा शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
या ठिकाणापासून आजची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्रीमहंत हरीगिरीजी महाराज, श्रीमहंत प्रेमगिरीजी महाराज, श्रीमहंत भागवतश्रीजी (अध्यक्ष) महाराज, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सोहनागरी महाराज, श्रीमहंत उमाशंकरभारती, श्रीमहंत विद्यानंद सरस्वती, देवानंद सरस्वती हरिद्वार, परशरामगिरी, नारायणगिरी, कमलपुरी, श्रीमहंत इंद्रपुरी महाराज, मोहन भारती, अशोकगिरीजी, धनराजगिरी, हिरापुरी, इंद्रानंद सरस्वती आदी मिरवणुकीत सामील झाले होते. त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तिर्थाचे दर्शन करून हा सर्व ताफा निल पर्वथावर पोहचला. (वार्ताहर)