विधानसभेसाठी पथके
By Admin | Updated: August 23, 2014 01:23 IST2014-08-23T01:20:46+5:302014-08-23T01:23:40+5:30
विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी :

विधानसभेसाठी पथके
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी गतिमान झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने आत्तापासूनच विविध पथके गठित करून त्यांना जबाबदारीचे वाटप सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात या पथकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, पथकांनी त्यांचा दैनंदिन कार्यअहवाल अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडे व त्यानंतर पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना आगाऊ देण्यात आल्या आहेत.