शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

टीईटीसाठी सहायक परिरक्षकांचे बैठे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:25 PM

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून, या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहायक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून, अशाप्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६१ केंद्रांवर परीक्षा : नियोजन बैठकीत गोपनीयतेसंदर्भात प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून, या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहायक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून, अशाप्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ परिरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची प्रशिक्षण सभा व पूर्वतयारी जिल्हा स्तर आढावा बैठक मंगळवारी (दि.१४) मविप्रच्या गंगापूररोड परिसरातील सीएससीएस महाविद्यालयात घेण्यात आली. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फ त निश्चत क रण्यात आलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र परीक्षार्थींची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ६१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असून, ३४ केंद्रांवर पेपर एकसाठी १२ हजार ६७९ तर पेपर दोनसाठी १० हजार १२९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.परीक्षेदरम्यान, पर्यवेक्षक सर्वेक्षक व परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात मोबाइलबंदी करण्याच्या सूचना उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे यांनी केल्या. शिक्षक पात्रता परीक्षेचे जिल्हा परिरक्षक उपशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण व विस्ताराधिकारी चंद्रकांत गवळी परीक्षेशी संबंधित गोपनीय साहित्य, परीक्षेपूर्वी परीक्षेच्या दिवशी व परीक्षा झाल्यानंतर केंद्र्र संचालक यांनी करावयाची कामे व जबाबदाºया, कर्तव्य याबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मुख्यालयातील विस्तार अधिकारी संतोष झोले यांनी प्रास्ताविक केले. नीलेश पाटोळे यांनी आभार मानले.दक्षता घेण्याच्या सूचनापरीक्षेसंदर्भात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात ९ झोनल अधिकारी, ६१ सहायक परिरक्षक व ६१ केंद्र संचालक यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील झोनल आॅफिसर व सहायक परिरक्षक यांच्या नियुक्ती सोडत पद्धतीने जबाबदाºया सोपविण्यात आल्या असून परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय दक्षतेने काम करताना प्रश्नपत्रिका, परीक्षाविषयक सर्व साहित्याची गोपनीयता राखण्यासाठी तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी केल्या.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र