मेशी, डोंगरगावी पावसाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:41+5:302021-05-01T04:14:41+5:30
सध्या परिसरात उन्हाळी कांदा काढणीचे कामे जोरदार सुरू आहेत. पावसाच्या शिडकाव्यामुळे कांद्याचे मोठ्या ...

मेशी, डोंगरगावी पावसाचा शिडकावा
सध्या परिसरात उन्हाळी कांदा काढणीचे कामे जोरदार सुरू आहेत. पावसाच्या शिडकाव्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकरी वर्गांची कांदा चाळीत भरण्यासाठी धावपळ होत आहे. काही शेतकरी शेतातच कांदा ताडपत्रीने झाकून ठेवत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी घरच्या घरीच कामे आटोपत आहेत.त्यामुळे कामे उरकताना खूपच धावपळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे रोगट हवामानाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होण्याची भीती आहे. शेतकरी खरीप पूर्व मशागतीचीही कामे करत आहेत. ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाने शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर पावसाळी वातावरण असे विचित्र दृश्य सध्या सगळीकडे पाहावयास मिळत आहे.