नाशिकरोडला वसंत व्याख्यानमाला
By Admin | Updated: April 30, 2015 00:15 IST2015-04-30T00:15:26+5:302015-04-30T00:15:40+5:30
उद्या शुभारंभ : सात दिवस चालणार ज्ञानयज्ञ

नाशिकरोडला वसंत व्याख्यानमाला
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ मेपर्यंत मनपा शाळा क्र. १२५ च्या क्रीडांगणावर नाशिकरोड वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
१ मे रोजी सायंकाळी ६.३० वा. व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष डॉ. डी. जी. पेखळे व प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, प्रभाग सभापती केशव पोरजे, आनंदनगर जॉगर्स प्रतिष्ठान अध्यक्ष रावसाहेब पोटे आदि मान्यवर उपस्थित राहाणार आहे.
पहिले पुष्प अभिनेता चिन्मय उद्गीरकर व अभिनेत्री मृणाल दुसानीस हे मुलाखतीद्वारे उलगडणारा जीवनप्रवास व सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर ग्रीन कुंभ उद्बोधन यावर गुंफणार आहेत. २ मे सच्चिदानंद शेवडे - सावरकर एक झंजावत, ३ मे कमलाकर देसले- जगणं समजून घेताना, ४ मे अपर्णा रामतीर्थकर - नाती जपतांना, ५ मे अमोल शेवडे - सुंदर मी होणार-सुंदर मी जगणार, ६ मे सालकर बाबा - दैनंदिन जीवनातील - भगवतगीतेची उपयुक्तता व ७ मे रोजी गीता माळी या गीतगंगा हा गाण्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर व्याख्यानमालेचा समारोप व पारितोषिक वितरण होणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष डॉ. डी. जी. पेखळे यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष श्यामराव चाफळकर, दत्ता गायकवाड, अशोक चोरडिया, मनोहर कोरडे, श्रीराम गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)