सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

By Admin | Updated: September 13, 2016 01:33 IST2016-09-13T01:32:00+5:302016-09-13T01:33:00+5:30

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

The spread of Maratha Kranti Morcha on social media | सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

प्रचाराचे संदेश : शांतता, शिस्त पाळण्याचे आवाहननाशिक : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातून २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा प्रचार व प्रसारासाठी तसेच मोर्चात सहभागी होताना शिस्तीचे नियम समजावण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. समाजाच्या प्रत्येक नियोजन बैठकीत उपस्थित नागरिकांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यावर कोर कमिटीकडून देण्यात येणाऱ्या सूचना समाजाच्या अंतिम स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.
कोपर्डीतील घेटनेच्या निषेधार्थ काढण्यात येत असलेल्या मोर्चाला सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्यासाठी ‘एक दिवस माणुसकीसाठी, एक दिवस समाजासाठी’ अशी भावनिक आवाहन करणारी पोस्ट व्हायरल होत असून, यात मोर्चासाठी जनसंपर्क वाढवण्यासोबतच मोर्चात महिलांचा सहभाग वाढविणे, मोर्चाच्या सुरुवातीपासूनच शिस्तीचे पालन करणे, मोर्चामध्ये तंबाखूसेवन व धूम्रपान टाळणे, व्यसन करणारी व्यक्ती आढळल्यास पोलिसांना अथवा स्वयंसेवकांना माहिती देणे, घोषणाबाजी टाळणे व रोखणे, महिला, लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणे, आक्षेपार्ह वर्तन टाळणे, मोर्चात स्वच्छता ठेवणे, दिसलेला कचरा उचलून कचराकुंडीत टाकणे आदि विविध सूचना फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात असून, मोर्चात कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडून नये विविध मार्गांनी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी समाजातील विविध नेत्यांनीही पुढाकार घेतला असून, शहरातील विविध प्रभागांसह जिल्हाभरात गाव, गट तालुका पातळीवर नियोजन बैठका सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The spread of Maratha Kranti Morcha on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.