टाकेद येथे औषध फवारणी व गरीबांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:26 PM2020-04-04T17:26:43+5:302020-04-04T17:27:39+5:30

सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.

Spread the drug at Takeda and distribute grain to the poor | टाकेद येथे औषध फवारणी व गरीबांना धान्य वाटप

टाकेद विद्यालयात ग्रामपंचायत मार्फत फवारणी करतांना रतन बांबले,ग्रा.वि.अधिकारी शिवाजीराव भामरे,रामचंद्र परदेशी,प्राचार्य तुकाराम साबले, सतिष जाधव,राजेंद्र गायकवाड. राजेंद्र जाधव. गोरख जोशी .चाबुकस्वार, गोडे गायके ईत्यादी मदत करत होते.

Next
ठळक मुद्देवीस कुटूंबाना ग्रामपंचायत मार्फत मोफत तांदुल

सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.
सद्या कोरोणा व्हायरसच्या भितीने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दररोजच्या मोलमजुरीने जिवनाचा उदरिनर्वाह करणारी गावातील कातकरी समाजातील काही मानसांनी ग्रामपंचायत मध्ये येऊन आपली व्यथा मांडली. सरपंच ताराबाई बांबले उप सरपंच रामचंद्र परदेशी ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव भामरे सामाजिक कार्यकर्ते रतन बांबले, राम शिंदे, नंदू जाधव, ग्रा. पं. सदस्य डॉ श्रीराम लहामटे, जगन घोडे, विक्र म भांगे, नंदा शिंदे, लता लहामटे ईत्यादींच्या प्रयत्नाने गावातील कातकरी समाजातील वीस कुटूंबाना ग्रामपंचायत मार्फत मोफत तांदुल देऊन त्यांना दोन घास खाता येतिल अशी सोय करण्यात आली.
कोरोणा व्हायरस च्या पाशर््वभूमीवर सर्वितर्थ टाकेद, बांबलेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी येथे ग्रामपंचायततर्फे सतत ट्रक्टरद्वारे औषधांची फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्यसेविका भारती सोनवणे, आशा प्रकल्पाच्या विजया बांबले सुनिता धादवड तसेच अंगणवाडी सेविका तारा परदेशी, अनिता गायकवाड, सुनिता जाधव, रिता परदेशी, सुमन धोंगडे, आशा भालेराव, राजुबाई घोडे, ज्योती भवारी तसेच ग्रा. पं. चे अधिकारी भामरे. सतिष जाधव, गोडे, चाबुकस्वार, जगताप व ईतर कर्मचारी ग्रा पं सदस्य हे गावात वाड्या वस्त्यांवर फिरु न ग्रृहभेटी देऊन जनजाग्रृती करत आहेत व गावात गर्दी होऊ नये म्हणून सतत दक्षता घेत आहेत.

 

Web Title: Spread the drug at Takeda and distribute grain to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.