देवळा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:41 PM2020-09-26T22:41:57+5:302020-09-27T00:42:24+5:30

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या आता ५०० पार झाली असून प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. शुक्रवारी देवळा शहरातील एका तरूणाचा कोरोनामुळे झालेला मृत्यु कोरोनाविषयी बेफिकीर असलेल्या नागरीकांच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारा ठरला असून यापुढे तरी तालुक्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread of corona in Deola taluka | देवळा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

देवळा येथे पाचकंदील चौकात विनामास्क फिरणा?्या वाहनचालकाची चौकशी करतांना पोलिस.

Next
ठळक मुद्दे प्रशासन चिंतीत : मास्क न वापरणायंविरूद्ध कडक कारवाई

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या आता ५०० पार झाली असून प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. शुक्रवारी देवळा शहरातील एका तरूणाचा कोरोनामुळे झालेला मृत्यु कोरोनाविषयी बेफिकीर असलेल्या नागरीकांच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारा ठरला असून यापुढे तरी तालुक्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोना मुक्त असलेल्या देवळा तालुक्यातील रुग्णांची संख्या२५ जुलै नंतर झपाटयाने वाढू लागली.कोरोना रूग्णांची वाढत चाललेली संख्या आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, प्रशासन तसेच पोलिसांनी घेतलेले परीश्रम शासनाने निर्देशित केलेले सामाजिक अंतर, मास्कचा वापर आदी कोरोना संसर्गा पासून दूर ठेवणाऱ्या नियमांचे पालन न करता नागरीकांनी दाखवलेली बेफिकीरीने फोल ठरल्याचे चित्र आहे. गत सप्ताहात देवळा पोलिसांनी मास्कचा वापर न करणाºया ३० वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

देवळा शहरातील काही कोरोना बाधित व्यक्ति देखील १५ दिवस घरात कोरांटाईन न होता जनतेत मिसळून फिरतांना दिसत असून कोरोना रूग्णांची संख्या वाढवण्यात हातभार लावत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सातत्याने कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष, मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर पाळण्यातली बेफिकीरी कोरोना संसर्ग वाढीस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहे. लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणाºया नागरीकांच्या संख्येवर शासनाने घातलेल्या मर्यादेचे पालन होत नाही.

लोकांमध्ये जनजागृतीसाठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे.करोना सोबत कसे जगावे....काय करू नये....याबाबत सम विचारी लोकांनी एकत्र येऊन एक जन आंदोलन सुरू झाले पाहिजे.जनतेनेच पुढाकार घेऊन नियम मोडणाºया जाब विचारला पाहिजे. लॉक डाऊन, दंड, शिक्षा ह्यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.
 डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.

 

Web Title: Spread of corona in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.