देशमानेत सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:08 IST2021-04-01T23:34:17+5:302021-04-02T01:08:47+5:30
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.

देशमानेत सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला.
गावातील गल्लीबोळात असलेला सर्व परिसर सोडियम हायपोक्लोराइडने निर्जंतुकीकरण करण्यात आला. यावेळी सरपंच प्रमोद दुघड यांनी ग्रामस्थांना कोरोना रुग्ण वाढीस आळा घालण्यासाठी खबरदारी घेणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरदेखील करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश दुघड, उपसरपंच यशवंत जगताप, सदस्य संजय खैरनार, आण्णा पवार, बापू काळे, माजी सरपंच प्रभाकर जगताप, पांडुरंग बोडके, अंबादास साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.
देशमाने येथे सोडियम हायपोक्लोराइडच्या औषधांची फवारणी करताना कर्पचारी. (०१ मानोरी)