सुरगाण्यात धूर फवारणी
By Admin | Updated: May 6, 2016 00:38 IST2016-05-05T22:47:44+5:302016-05-06T00:38:22+5:30
सुरगाण्यात धूर फवारणी

सुरगाण्यात धूर फवारणी
सुरगाणा : येथील एका युवकाचे डेंग्यूमुळे निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेत नगरपंचायत व आरोग्य विभागाने शहरातील विविध भागात डेंग्यू प्रतिबंधात्मक धूर फवारणी केली.
येथील होळी चौकातील पंकज संजय सौंदाणे याचा डेंग्यूची लागण झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाचे जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ.पी.एन. काकडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. रणवीर, डॉ. विजय साठे (माणी प्राथमिक आरोग्य केंद्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा शहरात डेंग्यूरोधक यंत्राद्वारे धूर फवारणी करण्यात आली. आरोग्य विभागाने दोन नवीन धूर फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. यंत्र मिळण्यासाठी नगरपंचायतने पाठपुरावा केला होता.
शहरात फवारणी करतेवेळी नगराध्यक्ष रंजना लहरे, उपाध्यक्ष सचिन अहेर, नगरसेवक भारत वाघमारे, सुरेश गवळी, प्रकाश वळवि, शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, भास्कर पवार, एकनाथ भोये, चाफळकर, गणेश पवार, सुनिल पवार, मुन्ना पवार आदिंसह अतिरिक्त गटविकास अधिकारी पवार, आरोग्य कर्मचारी व्ही. के. चतूर, एस.एन.गोसावी, आर. एल. चौधरी, बी.जे.दळवी आदि उपस्थित होते.(वार्ताहर)