Spontaneous response to the tennis tournament | टेनिस स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

‘रॉड्रिग्ज कप/जिस्टा नाशिक ’ या स्पर्धेचे पारितोषिक डि.एस.रामाराव यांना देताना अ‍ॅन्जला रॉड्रीग्ज.समवेत बाबा रॉड्रिग्ज.

ठळक मुद्देनिवेकचे पदाधिकारी संदीप गोयल, रणजीत सिंग, पंकज खत्री, जनक सारडा, रमेश वैश्य, बाबा रॉड्रिग्ज, सिरील रॉड्रिग्ज,अन्जला रॉड्रीग्ज आदींच्या हस्ते पारितषिके देण्यात आली.नाशिक : सातपूर येथील निवेक क्लब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे चुरशीचे सामने झाले. अखिल भारतीय स्तरावरील ‘रॉड्रिग्ज कप/जिस्टा नाशिक २०१९’ या स्पर्धा नाशिक डिस्ट्रिक्ट सिनिअर टेनिस खेळाडू व निवेक क्लबच्या सहकार्याने संपन्न झाल्या.

एकेरी स्पर्धेत ३५ वर्षांवरील वयोगटात जिम्मी कक्कड,४५ वर्षांवरील गटात नितिन किर्तने,६५ वर्षांवरील गटात डि.एस.रामाराव यांनी विजेतेपद मिळविले. तर दुहेरीत ३५ वर्षांवरील गटात मंदार वाकनकर आणि नंदू रोकडे,४५ वर्षावरील गटात नितीन किर्तने व अजय कामत,५५ वर्षांवरील गटात मेहेर प्रकाश व शंकर यांनी ६५ वर्षावरील वयोगटात पद्मालू आणि श्रीकांत पारेख या जोडीने विजेतेपद मिळविले.
--

Web Title:  Spontaneous response to the tennis tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.